Ad Home

#

RTE 25 % admission 2024 -25 new guideline| आर टी ई 25% एडमिशन 2024-25 नवीन नियमावली जाहीर

 

RTE 25 %admission 2024 -25 new guideline|
आर टी ई 25% एडमिशन 2024-25 नवीन नियमावली जाहीर

सन २०२४-२५ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२


(सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी


शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया


ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येत आहे.


शासन संदर्भ क्र.७ नुसार प्रवेशप्रकीयेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पुर्ण झालेली आहे. 

बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रीया शुक्रवार दिनांक १७.०५.२०२४ ते ३१.०५.२०२४ या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


 • यापूर्वी सन २०२४-२५ या वर्षाकरिता आरटीई २५ टकके प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रीया स्थगित करण्यात आलेली आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी ऑनलाईन पदधतीने केलेल्या अर्जाच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टकके प्रवेश प्रक्रीयेसाठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी.

 • ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिध्दी देऊन ऑनलाईन सोडत (लॉटरी) काढण्याकरिता दिनांक निश्चित केली जाईल. उक्त तारखेस ऑनलाईन पध्दतीने सोडत (लॉटरी) काढण्यात येईल. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रीयेसाठी एकाच टप्यात लॉटरी काढली जाईल. तसेच शाळेत आरटीई अंतर्गत उपलब्ध जागांएवढी एक प्रतिक्षा यादी (बेटींग लिस्ट) तयार केली जाईल. लॉटरी लागलेल्या विदयार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल. या कालावधीमध्ये विदयार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर पहिल्या प्रतिक्षा यादी (बेटींग लिस्ट) मधील अनुक्रमे विदयार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज पाठविला जाईल. मगच प्रतिक्षा यादीतील विदयायिांनी अलीटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा. या कालावधीत विदयाध्यर्थ्यांनी प्रवेश घेऊन शळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर दुसऱ्या प्रतिक्षा यादी (बेटीग लिस्ट) मधील अनुक्रमे विदयार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज एनआयसीव्दारे पाठविला जाईल. मगच दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विदयार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून बिहोत मुदतीत प्रवेश घ्यावा. अशा पदधतीने आरटीई


प्रवेशपात्र शाळांची प्रवेश क्षमता पूर्ण होईपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या प्रतिक्षा यादीतील विदयार्थ्यांना


एन.आय.सी. कडून मेसेज पाठविले जातील.

• सोडत (लॉटरी) झाल्यांनतर पडताळणी समितीला आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगीनला विदयार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील. विदयार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विदयार्थ्यांना प्रवेशासाठी बोलविले आहे


त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत पडताळणी समितीने प्राप्त करुन घ्यावी. कागदपत्राची प्राथमिक तपासणी करुन योग्य असलयास विदयार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी तसेच पालकाकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व ती नोंद करुन


पालकांना परत करावे तसेच पालकांकडून हमीपत्र भरुन घ्यावे.


• काही पालक मूळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतर होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिलेल्या तारखेस


पालक आलेले नाही तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात याव्यात. बालकांना प्रवेश घेण्याकरिता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा.

 पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरीता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी


करण्यात यावी. गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला प्रवेशाकरीता तीन संधी देऊनही पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत आरटीई पोर्टल बर Not Approch करावे. पडताळणी समिती केंद्रावर गर्दी होणार नाही व बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.


•. पडताळणी समितीने सविस्तर माहिती सर्वांना दिसण्यासाठी पोर्टलवर भरावी व दिसते का याची खात्री करावी.


•. पडताळणी समितीने मागील वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी विचारात घेवून पडताळणी विषयक कामकाज वेळेत होईल या दृष्टीने नियोजन करावे. पडताळणी समितीने रहिवासी पत्ता, गुगल वरील पत्ता व वय वाची पडताळणी सर्व पात्र विद्यार्थ्यांची करावी. सामाजिक वंचित संवर्गातील विद्यार्थ्यांकरीता जात प्रमाणपत्राची तर आर्थिक दुर्बल संवर्गातील विद्यार्थ्यांकरीता उत्पन्न प्रमाणपत्राची पडताळणी करावी. या दृष्टीने


आवश्यक सुविधा गट शिक्षण अधिकारी स्तरावर करण्यात यावेत.

 समितीने संबंधित विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासणी करून प्रमाणित केल्यांनतर सदर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सुविधा आर.टी.ई. पोर्टलवर करण्यात येत आहे. पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी


गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीचे पत्र घेवून शाळेत जातील. शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार नाही. जे विद्यार्थी कागदपत्रे तपासणीमध्ये अपात्र होतील त्यांची निवड रह करण्यात यावी व अशा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे तक्रारीची दाद मागता येईल. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचा निर्णय मान्य नसल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे दाद मागता येईल व त्यांचा निर्णय अंतिम राहील. शासन निर्णय दिनांक २१.०४.२०१४ नुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जिल्हा, तालुका व न.पा./म.न.पा. स्तरावर तक्रार निवारण केंद्र व मदत केंद्राची स्थापना करावी.

 प्रतिक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही.


• पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे


अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा.


•. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किया निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी.


•. सदरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून त्याची अंमलबजावणी करावी. 

खालील नवीन परिपत्रक वाचा ⬇️



परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


RTE 25% Admission साठी आवश्यक कागद 

 पत्रे 


RTE 25% Admission पालकासाठी सूचना  


RTE 25%Admission 2024-25 student age विध्यार्थी वय

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Ad code
Ads code