Ad Home

#

RTE 25% Admission आवश्यक कागदपत्रे

 

RTE 25% Admission आवश्यक कागदपत्रे

कागदपत्रांची सूची

वंचित गटातील बालकांमध्येखालील प्रवर्गाचा समावेश होतोः-

1) जात संवर्गातील 

अनुसूचित जाती(S.C.),

अनुसूचित जमाती(S.T.) 

विमुक्त जाती अ (V.J.A),

भटक्या जमाती ब(N.T.B)

भटक्या जमाती क (N.T.C)

भटक्या जमाती, (ड) (N.T.D)

इतर मागास (O.B.C.) 

विशेष मागास बालके (S.B.C.)


२) दिव्यांग बालके,


३) एच.आई.व्ही.(H.I.V.) बाधित किंवा एच.आई.व्ही प्रभावित बालके,


४) कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन)


५) अनाथ बालके


वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र (वडिलांचे/बालकाचे )

उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. 

तहसीलदार / उपजिल्हाधिकारी/उपविभागीय महसूल अधिकारी याांचे प्रमाणपत्र. 

पालकाचा (वडिलांचा/बालकाचा) जातीचा दाखला आवश्यक 

परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.


6)दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाण पत्राचा पुरावा


जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधीक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय याांचे *४० टक्के* आणि त्या पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.


एच.आय.व्ही. बाधित / प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे


जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र

अ) कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे 

*निधन*

*1 एप्रिल २०२० ले ३१ मार्च*२०२२* 

या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले) अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागद पत्रे


वंचित गटातील बालकांमध्ये कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे 

निधन 1 एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ 

या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले) प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आला आहे.


अ) सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबधित पालकाचे मृत्युप्रमाणपत्र


ब) कोव्हीड १९ मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र. ( *Medical Certification of Cause of Death (Form No.4), (SeeRule7))* 


सदर मृत्यू कोव्हीड १९ शी संबधित असल्याबाबतचे प्रमाणन है शासकीय/पालिका/महानगरपालिका, रुग्णालय अथवा आय.सी.एम.आर. नोंदणीकृत खाजगी रुग्णालय/प्रयोगशाळा यांचा अहवाल.


अनाथ बालके :- (वंचित घटक)


अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची / बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत.

जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील

अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदा. वार्षिक उत्पन्नाचा दाखला इ. विचारात घेण्यात येऊ नयेत.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास

वार्षिक उत्पन्नाचा दाखला

स्लीप, 

कंपनीचा किंवा Employer चा दाखला, (आर्थिक वर्ष २०२१ २०२२ किंवा २०२२-२०२३ मार्च अखेरचे एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले) उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही.

न्यायालयाचा निर्णय.


घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे


 घटस्फोटित महिलेचा / बालकाच्या आईचा रहहवासी पुरावा. ३) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

आधार कार्ड


वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक


विधवा महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.

 बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.


आर.टी.ई.२५ टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी / पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणांमुळे बालक / पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे / पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधारकार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास आर.टी.इ.२५ टक्के अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी.

जन्मतारखेचा पुरावा


(वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक )


ग्रामपंचायत /न.पा./ म.न.पा. यांचा दाखला / रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला / आंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला / आई, वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञा पत्रा‌द्वारे केलेले स्वयंनिवेदन.

रहिवासाचा / वास्तव्याचा पुरावा


(वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक )


रेशनिंग कार्ड, 

ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालविण्याचा परवाना.), 

वीज / टेलिफोन बिल देयक, 

पाणी पट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक/ घरपट्टी, 

फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, 

आधार कार्ड, 

मतदान ओळखपत्र, 

पासपोर्ट 

या पैकी कोणतेही एक. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडेकरार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

पतीचे मृत्यूपत्र (प्रमाण पत्र)

विधवा महिला

विधवा महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. 

बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

आवश्यक कागदपत्रे यासाठीचे प्रपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.  


RTE 25% Admission पालकासाठी सूचना साविस्तर वाचा व pdf download करा



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Ad code
Ads code