Ad Home

#

Udise plus 2024-25 | शैक्षणिक वर्ष 2024 -25 मध्ये UDISE+ प्रणाली मध्ये माहिती भरण्याबत.

 

Udise plus 2024-25 | शैक्षणिक वर्ष 2024 -25 मध्ये UDISE+ प्रणाली मध्ये माहिती भरण्याबत.

➡️ बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अन्वये स्थानिक प्राधिकरण यांचेमार्फत माहितीचे संकलन आणि माहिती व्यवस्थापन करणे अनिवार्य आहे. आरटीई कायद्यांतर्गत माहिती संकलन आणि शाळांना युनिक यु-डायस + कोड देण्यासाठी UDISE + यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.


➡️ संदर्भाधीन पत्रान्वये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी UDISE + प्रणालीमध्ये माहिती भरण्यासाठी राज्यांना दि.०१.०४.२०२४ पासून पोर्टल उघडण्यात येणार आहे. तसेच दि.३१.०७.२०२४ पर्यंत राज्यांनी माहिती भरुन दि.३०.०९.२०२४ पर्यंत अंतिम प्रमाणपत्रता (Final Certification) पूर्ण करणे अपेक्षित आहे.


➡️नवीन शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची नावनोंदणी व एकूण नोंदणी दर (Gross Enrollment Ratio) १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कुलिंग (NIOS) मध्ये नावनोंदणी केलेल्या १४-ते १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी डाटा कॅप्चर फ़ॉरमॅट (Data Capture Format) यंत्रणा विकसित केली असून त्यासंबंधी माहिती NIOS यांचेमार्फत संकलित करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त अनौपचारिकरित्या शिक्षण देणा-या संस्था (UDISE कोडशिवाय) (उदा. खाजगी पूर्व प्राथमिक शाळा, शासनाची मान्यता नसणा-या शाळा तसेच स्वतंत्र कौशल्य केंद्रे) मधील विद्यार्थ्यांच्या नोंदणी व उक्त संस्था यांच्या संदर्भातील माहिती संकलित करण्यासाठी डाटा कॅप्चर फ़ॉरमॅट BRC/CRC मध्ये


➡️व्यवस्था करण्यात आली असून त्यासंबंधी दि. २३.०३.२०२३ रोजीच्या पत्रान्वये सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि ब-याच राज्यांकडून सदर व्यवस्थेचा वापर करण्यात येत नसल्याबाबत आढळून आले आहे. तसेच ब-याच राज्यांनी UDISE २०२३-२४ मधील माहिती अद्यापि संकलित केली नसून Data Duplication व Drop Box Issue यासंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. सदर प्रकरणी तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.


➡️ केंद्र शासनाच्या उपरोक्त पत्राच्या अनुषंगाने, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये UDISE + प्रणालीवर माहितीचे संकलन योग्यरित्या करुन Data Duplication व Drop Box Issue संदर्भातील कार्यवाही तातडीने करावी. UDISE + प्रणालीमध्ये माहितीचे वेळेत संकलन न झाल्यास आरटीई कायद्याचे उलंघन होत असल्याने सदर प्रकरणी कालमर्यादेत कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरुन संदर्भाधीन पत्रात नमूद केल्याप्रमाणे संबंधितांना सूचना देण्यात याव्यात.

Udise+ काही महत्वाच्या लिंक्स. 

                        ⬇️


UDISE PROFILE MODULE  


UDISE STUDENT MODULE  


UDISE TEACHER MODULE  


UDISE REPORT  MODULE 


खालील प्रपत्र डाऊनलोड करा 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Ad code
Ads code